सीएससी सेवा केंद्राच्या माध्यमातून बैंकेत असलेली रक्कम खातेधारकाला काढून मिळणार ; संपर्क साधण्याचे आवाहन -दिपक धांडे ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
गेल्या २२मार्च २० पासून संपूर्ण देश शासनाच्या आदेशाने लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिक गेल्या महिन्यापासून घरीच आहे.अश्या बिकट परिस्थितीत अनेकांचे बैंक व्यवहार ठप्प झाले आहे . बाहेर जाता येत नाही व बँकेत तोबा गर्दी याकरिता येथील माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी सीएससी (c s c ) सेवा केंद्राच्या माध्यमातून बैंकेत असलेली रक्कम खातेधारकाला काढून देण्याचे ठरविले आहे यामुळे गर्दी होणार नाही व गरजुना मदत होईल .
श्री समर्थ सेवा केंद्र जुना सातारा जळगाव रोड भुसावळ येथे सर्व बँके मधील खातेधारक यांचे पैसे १९ एप्रिल २० एप्रिल या दोन दिवसांमध्ये सकाळी ११ ते ५ या दरम्यान काढून दिले जातील .
केंद्र शासनाने ज्या महिलांनी जन धन योजनेचे बँक खाते उघडले आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये ५०० रूपये टाकलेले आहे तसेच ज्या महिलांनी उज्वला गॅस अंतर्गत गॅस सिलिंडर घेतलेले आहे अशा महिलांच्या बँक खात्यात सुध्दा ७४४ रू टाकलेले आहे तसेच शेतकरी पंतप्रधान किसान योजना अतर्गत सुध्दा शेतकऱ्याच्या खात्यात ६००० रूपये टाकलेले आहे
तसेच संजय गांधी योजना , इंदिरा गांधी योजना , श्रावण बाळ योजना अशे अनेक योजनेचा मध्यामातून बँके मध्ये पैसे टाकलेले आहे त्यामुळे सर्वच बँके मध्ये लोकांची गर्दी दिसून येत आहे त्यामुळे हि गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने दीपक धांडे यांनी श्री समर्थ सेवा केंद्र जुना सातारा जळगाव रोड भुसावळ येथे सर्व बँकेचे पैसे सीएससी सेवा केंद्राच्या माध्यमातून १९ एप्रिल २० एप्रिल या दोन दिवसांमध्ये सकाळी ११ ते ५ या दरम्यान सर्व नागरिकांना कुठलाही मोबदला न घेता सुरू केलेली आहे म्हणून ज्यांना बॅंकेतून पैसे काढायचे असल्यास त्यांनी येताना बँक पास बुक, आधारकार्ड ,घेऊन यावे व येताना कोरोना पासून वाचण्यासाठी कृपया सर्वांनी तोंडाला मास्क लावून यावे व शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन दीपक धांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *