भुसावळ विभागातील १० कर्मचा-यांकडून कोरोना निधी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना कोवीड १९ या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्‍ये हाहाकार माजविला असून आपल्‍या देशाला सुध्‍दा त्‍याचा फटका बसला आहे.अशा नाजुक परिस्‍थितीत भुसावळ विभागातील १० रेल्‍वे कर्मचा-यांनी पुढाकार घेत कोरोना कोवीड १९ च्‍या लढ्‍यात केंद्र सरकारला मदतकार्य केले आहे. विभागातील बडनेरा येथील मालगाडी गार्ड दिलीप सिंग सरदार सिंग,नांदगाव येथील मालगाडी लोको पायलट सतीशचंद्र जे.गीते,भुसावळ येथील विद्‍युत टिआरएस मधील तंत्रज्ञ रविंद्र चिखलकर व मुख्‍य कल्‍याण निरीक्षक दिपा स्‍वामी या चौघांनी आपला एक महिन्‍याचा पुर्ण मुळ पगार,भुसावळ सी.अॅन्‍ड.डब्‍ल्‍यु विभागातील कार्यालय अधिक्षक (कार्मिक) मंगेश कुळकर्णी ५० हजार,मुख्‍य कार्यालय अधिक्षक(कार्मिक)एस.के.तिवारी २५ हजार, भादलीचे उपस्‍थानक व्‍यवस्‍थापक दिपक रामदास चिलवंत व प्रयोगशाळा अधिक्षक ओम प्रकाश पांचोली प्रत्‍येकी ११ हजार रु.व भुसावळ कार्मिक विभागातील कनिष्‍ठ लिपीक चुमूनसिंह व रेल्‍वे स्‍कुलच्‍या सहा य्‍यक शिक्षीका संध्‍या यु.वसावे या दोघांनी आपला दोन दिवसांचा मुळ वेतन पीएम केअरला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *