भुसावळ तालुक्यातील बेलवाय व गोंभी शिवारात अवैध दारू भट्टया उद्धस्त ; तालुका पोलिसांची कारवाई ; 49 हजाराचा मुद्देमाल नष्ट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील बेलवाय व गोभी शिवारात तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकारी यांनी अवैध हातभट्टी दारू अद्द्यावर छापे टाकून सुमारे 49 हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
तालुक्यातील बेलव्हाय या गावात बेलव्हाय शिवारात वाघुर नदी च्या काठावर शनिवार रोजी 12.45 वाजता संशयीत आरोपी सिताराम रामा सोनवणे हा गावठी हात भट्टीची दारू गाळण्याची भट्टी रचून गुळ ,महू, नवसागर मिश्रीत रसायनाची दारू गाळतांना रसायनचे 5 पत्री ड्रम मध्ये 900 लिटर, आणि गावठी हातभट्टीची 55 लिटर तयार दारू असे अंदाजे किंमत 34हजार 450 रुपयांच्या मालासह मिळुन आला आहे .
तसेच
गोंबी शिवारात वाघुर नदी च्या काठावर 5 वाजता समाधान सुभाष कोळी हा गावठी हात भट्टीची दारू गाळण्याची भट्टी रचून गुळ ,महू , नवसागर, रसायनाचे 10 प्लास्टीक कँन व 01 प्लास्टीक व पत्री ड्रम 200 लिटर मापाचे त्यात एकूण 450 लिटर, रसायन आणि गावठी हातभट्टीची 20 लिटर तयार दारू असे अंदाजे किंमत 15 हजार 300 रुपयांच्या मालासह मिळुन आला. छाप्यात एकुण 07.ड्रम व 10 प्लास्टीक कँन मध्ये 1हजार 350 लीटर रसायन व गावठी हातभट्टीची दारूसह एकूण 49 हजार 750/- किंमतीचा माल मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादवि कलम 270 ,188 अन्वये असे दोन गुन्हे दाखल करण्यात आ़ले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *