भुसावळ आरोग्य विभागासाठी २० लिटर सॅनिटाइजर उपलब्ध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका आरोग्य विभागासाठी बारामती ॲग्रो व आमदार रोहित पवार यांच्या तर्फे व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या सहकार्याने २० लिटर तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ५०० लिटर सॅनिटाइजर देण्यात आले .
यावेळी जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे,गटविकास अधिकारी विलास भाटकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगिता दवंगे,गट शिक्षण अधिकारी टि.डी. प्रधान,किन्ही सरपंच हर्षाताई येवले,प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी आर.के.गायकवाड,डॉ. कल्पना दवंगे,उपसरपंच प्रदीप कोळी,कैलास येवले,जी.आर.चौधरी आदी मंडळी बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *