टेंभा आरोग्य केंद्रात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

साक्री – कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आहे या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली .
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल 2020 रोजी प्राथमिक आरोग्य केन्द्र टेंभा ता.साक्री येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिलकुमार उबाळे यांचे
हस्ते माल्यार्पण करून महामानव बाबासाहेब यांना मानवंदना देण्यात आली. प्रसंगी प्रामुख्याने सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले . यावेळी आरोग्य केन्द्रातील कर्मचारी वृंद उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *