आरटीओ संघटने कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन  कोटी मदत 

मुंबई (प्रतिनिधी )-
देशभरातील कोरोना महामारी ,त्यानंतर घोषित झालेले लॉकहाऊन, महाराष्ट्राचे बंद पडलेले महसूल  स्त्रोत यापार्श्वभूमीवर   कार्यकारी अधिकारी संघटना मोटार वाहन विभागाने (RTO) .सर्व सभासद अधिकाऱ्यांच्या सहमतीने आपल्या तीन दिवसांच्या एकूण पगाराइतकी रकम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा ठराव पारित केला होता त्या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयाने परिपत्रक जारी करून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपलब्ध करून देण्याची तजवीज केली आहे. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल देणारे राज्य ,सर्वाधिक उद्योग
व्यापार असणारे राज्य  अशी ओळख असूनही,काही घटनांच्या मुळे राज्याच्या आर्थिक संकटात वाद होते की काय याबाबत विभागातील सर्व अधिकारी साशंक होते. ज्या शासनाने आजवर मायेचे छत्र दिले ,हक्काची भाकरी दिली ते महाराष्ट्र शासन अडचणीत असताना राज्याचा स्वाभिमान अस्मिता जपण्यासाठी शक्य  तितके तीन दिवसांच्या वेतनाच्या रकमेच्या अतिरिक्त  दान :
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस थेट करुन त्याची नोंद संघटनेकडे द्यावी असे भावनिक आवाहन काल RTO अधिकारी संघटनेच्या वतीने विभागातील अधिकाऱ्यांना करण्यात आले होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,आरोग्य मंत्री व एकूणच शासन ज्या पद्धतीने झोकून देऊन खंबीरपणे यासंकटकाळी  उभे ठाकले आहेत त्याने प्रभावित होऊन व महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला कुठेही धक्का  लागताकामा नये या सामुहिक भावनेने अधिकान्यांनी सदर आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत  2016230/-  इतका निधी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिल्याची नोंद सभासदांनी संघटनेकडे दिली आहे.कोणत्याही श्रेयावादाची औपचारिकता न बाळगता सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने केवळ २४ तासात जमा केलेल्या निधीची प्रेरणा घेऊन इतर विभागांनीही आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य आर्थिक दृष्टया  स्वयंपूर्ण होण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मोटार वाहन विभाग (RTO)   कार्यकारी अधिकारी संघटना , सचिव  विजय इंगवले  यांनी पत्रकाद्वारे  केले  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *