भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड -१९ मुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रीमियम गाड्या, मेल / एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाटा मेट्रो रेल, कोकण रेल्वे इत्यादी सर्व प्रवासी
रेल्वे सेवाआता लॉकडाऊन पार्ट-2 म्हणजे ३ मे २०२० पर्यंत रद्दच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मालवाहतूक गाड्या सुरुं राहतील .
मालवाहतुक गाडया सुरु;
देशाच्या विविध भागात आवश्यक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वस्तू आणि पार्सल गाड्यांची वाहतूक कायम राहील.
तिकिटे रद्द करणे:
अनारक्षित आणि प्रवासी आरक्षण केंद्रातील सर्व तिकिट काउंटर पुढील आदेश होईपर्यंत बुकिंगसाठी निलंबित (बंद) राहतील. पुढील आदेशांपर्यंत ई-तिकिटांसह गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण होणार नाही. तथापि, ऑनलाइन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहील. पुढील आदेश येईपर्यंत ३ मे नंतरच्या ई तिकिटांसह कोणत्याही प्रकारची बुकिंग केली जाणार नाही.
परतावा:
रद्द केलेल्या गाड्यांच्या आरक्षणासाठी संपूर्ण परतावा मिळेल. अद्याप रद्द न झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण रद्द करणा-यांना देखील पूर्ण परतावा मिळेल.
३ मे २०२० पर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या ऑनलाइन तिकीटांचा परतावा रेल्वेमार्फत ग्राहकांना ऑनलाईन स्वयंचलितपणे पाठविला जाईल. ज्यांनी काउंटरवर तिकीट बुक केले आहेत ते ३१ जुलै २०२० पर्यंत परतावा मिळवू शकतील.
अधिक माहितीसाठी: www.indianrailways.gov.in,
www.irctc.co.in आणि www.cr.indianrailways.gov.in वर लॉग इन करावे.



