वरणगाव (प्रतिनिधी )- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या १२९ व्या जयंती निमीत नगर परिषद कार्यालयात अभिवादन करण्यात आले
येथील नगरपरिषद कार्यालयात डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्ष सुनिल काळे यांच्या हस्ते करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले तर आबेडकर नगर जवळील बाबासाहेब यांच्या पुतळ्यास माजी नगराध्यक्षा अरुणाबाई इंगळे यांचे हस्ते तर वामन नगर येथील विहारात नगर सेविका माला मेढे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभीवादन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष शे अखलाक शे युसुफ , नगरसेवक राजेंद्र चौधरी , सुधाकर जावळे , नगरसेविका जागृती बढे ,प्रतिभा चौधरी मुख्यधिकारी श्याम गोसावी उपस्थीत होते.
तर शहरात नागरिकानी सचार बंदी असल्याने कुठेच गर्दी न करता शासनाचे आदेशाचे पालन करुन घरातच डॉ बाबासाहेबाच्या प्रतिमेचे पुजन करीत अभिवादन केले



