पाचोऱ्यात तरुणीने साकारली रंगोळीतून डॉ. बाबासाहेबांची आकर्षण मूर्ती

पाचोरा –
येथील बाहेरपुरा भागातील जवाहर हाउसिंग सोसायटी जवळील चर्मकार समाज मंदिरात अश्विनी अहिरे या तरुणीने रांगोळीतुन राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्ताने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हुबेहुब मूर्ती साकारली. रंगोळीतून ही मूर्ती काढल्याने या तरुणीच्या कलागुणांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक मूर्ती पाहून बाहेरपुरा भागातील छोटू गोविदा चौधरी यांनी या तरुणीला १०१ रुपये रोख देऊन गौरविण्यात आले व चर्मकार समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संदीप गाडेकर, बापू अहिरे, छोटू चौधरी, गोविंदा चौधरी, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *