पाचोरा ( प्रतिनिधी ) दि. 14 जून 2025:
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील 25 वर्षीय शेतकरी युवक मोहित जगतसिंग पाटील याचा आज शनिवार दुपारी सुमारे 3:50 वाजता वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना मोहित यांच्या शेतातच घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

दुर्घटनेनंतर गावातील दिपक राजपूत, बाला जामसिंग पाटील, भरत सूरसिंग पाटील, पंढरीनाथ पाटील, बाळासाहेब कुमावत, कोतवाल गणेश पाटील, पोलीस पाटील चंद्रशेखर पाटील, कैलास कुमावत, कैलास रायसिंग पाटील, प्रतिश पाटील, संदीप राजपूत, अशोक आबा पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
मोहित यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉ. अक्षय सोनवणे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या अपघाती मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. युवा वयात शेतकऱ्याचे जाणे हे खरोखरच गावासाठी मोठी हानी मानली जात आहे.


