तळोदा तालुक्यात भीषण अपघातात चौघै ठार –

तळोदा – भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रोझवा-तलावडी रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारात घडली. भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलीस सूत्रानुसार, देवीदास रुबजी पाडवी (रा.रोझवा पु क्र.4) हा दुचाकी (एम.एच.39 एच.5067) ने आणि विश्वास मोग्या चौधरी (जुने रोझवा ता.तळोदा जि. नंदुरबार) हा स्प्लेंडर दुचाकी (2326 नंबर अर्धवट) ने समोरासमोर धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले.

या अपघातात अन्य तीन जण जखमी झाल्याने त्यांना नंदुरबार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नसून, भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक राजू लोखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार, अंमलदार राजकुमार जाधव पुढील तपास करीत आहेत.