धान्य लाभार्थ्यांना अन्य रेशन दुकानामधून धान्य वितरित करा : प्रा.धिरज पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ येथील जुना सातारा, कडू प्लॉट भागातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२ या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केल्याने या दुकानातून लाभ घेणाऱ्या
धान्य लाभार्थ्यांची व्यवस्था अन्य रेशन दुकानात करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे .
जळगाव रोड परिसरातील श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी, परिसरातील शिधापत्रिका धारकांना दिनांक ११ व १२ एप्रिल २०२० रोजी धान्य मिळाले होते. परंतु मागील महिन्यांच्या धान्य साठ्यात तफावत असल्या कारणाने भुसावळ येथील जुना सातारा, कडू प्लॉट भागातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२ या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी रद्द केला आहे अशी माहिती मिळाली.
हा परवाना रद्द झाल्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थीं व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना, या भागातील अतिरिक्त धान्य लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास असुविधा होणार आहे. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रशासनाने या लाभार्थ्यांना त्वरित त्याच भागातील अन्य दुकानां मधून धान्य वितरित करावे अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्या कडे केली आहे.
सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही, आसपासच्या दुकानात ग्राहकांची व्यवस्था केली जाईल. पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेल यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे असे आश्वासन पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *