फैजपूर (प्रतिनिधी )-
यावल तालुक्यातील भालोद व अकलूज या गावातील दोन स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना शासकीय नियमापेक्षाकमी धान्य देत असल्याचे निदर्शनास आल्याने दोघा दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भालोद, ता.यावल येथील बळीराम एम.चौधरी यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक 74 यांच्या दुकानात उपस्थित ग्राहकांना धान्य दुकानदार यांनी किती धान्य वाटप केले आहे याची खातरजमा माहिती घेण्यासाठी तसेच तपासणी करण्यासाठी प्रांताधिकारी अजित थोरबोले गेल्यानंतर संबंधित दुकानदार हा ग्राहकांना शासनाने ठरवलेल्या धांन्यापेक्षा कमी धान्य देत असल्याचे निदर्शनास आले तसेच तालुक्यातील अकलूज येथील राजू गिरधर कोळी यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक 89 यांनी कोणतेही धान्य ग्राहकांना वाटप केले नाही शिवाय त्यांच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य मिळाले नसल्याने बामणोद मंडळाधिकारी बी.एम.पवार यांनी फैजपुर पोलीस स्टेशनला संबंधित दुकानदारांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



