भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील चोरवड रोडवर मोटरसायकलवरुन कॅनमधून गावठी हातभट्टीची दारु चोरुन विक्री करण्यास घेऊन जाणाऱ्या एकास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पो. हे. कॉ. अजय माळी ,विठ्ठल फुसे, प्रवीण पाटील ,रियाज काझी, होमगार्ड भूषण पाटील रविवार १२ रोजी पेट्रोलिंग करीत असतांना ११.३० वाजेच्या सुमारास कन्हाळा (बुद्रुक) गावाच्या पुढे चोरवड रोडवर हिरू बुधु गवळी हा त्याच्या मोटर सायकलला लटकवलेली एक कॅन व बाजूला ठेवलेले दोन कॅन असे एकूण तीन कॅन मध्ये १०५ लिटर गावठी हातभट्टीची दारु व मोटरसायकल सह अंदाजे २४ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून प्रोव्ही कायदा अन्वये आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत भा.द.वी. कलम २७० ,२७१ ,१८८ ,अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



