म्हशीचे ५ पारडु निर्दयतेने कोंबुन वाहतुक ; दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ; कजगाव येथील घटन :


भडगाव –
भडगाव तालुक्यातील कजगांव बसस्टँड जवळ महिंद्रा पिकअप मधे म्हशीचे ५ पारडु दोरखंडाने निर्दयतेने कोंबुन प्राण्यांना इजा होईल अशा प्रकारे बांधुन वाहतुक करतांना मिळुन आले. म्हणुन २ जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी-सुरज बापुराव पाटील (वय-२०) धंदा- शिक्षण रा. पांढरद ता.भडगांव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,विकास राजपुत असे आम्ही कजगांव बसस्टैंड जवळ थांबलेलो होतो. तेव्हा भडगांव ते चाळीसगांव जाण्या-या रोडवर भडगांव कडुन एक महींद्रा कंपनीची पिकअप गाडी क्र. एम.एच-१९ सी.वाय.७०५९ ही पिक अप संशयास्पद येतांना दिसली. तीला कजगांव बसस्टँड जवळ थांबलेलो असतांना थांबवुन या गाडीचे पाठीमागील बाजुस पाहीले असता या गाडीमध्ये म्हशीचे ५ पारडु दोरखंडाने निर्दयतेने कोंबुन प्राण्यांना इजा होईल अशा प्रकारे बांधुन वाहतुक करतांना मिळुन आले .म्हणुन आम्ही या गाडी वरील ड्रायव्हरला त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव कुरेशी जावेद खलील वय-२७ रा. मिल्लत नगर पोस्ट शेंदुर्णी ता. जामनेर. व त्याच्या सोबत असलेल्या माणसाचे नाव कुरेशी खलील ईस्माईल वय-५१रा. मिल्लत नगर पोस्ट शेंदुर्णी ता.जामनेर . असे सांगीतले. ९ वाजे सुमारास वाजता सुमारास भडगांव ते चाळीसगाव जाणारे रोडवर कजगांव बसस्टँड जवळ गाडीमध्ये म्हशीचे ५ पारडु भरून प्राण्यांचा छळ होईल अशा प्रकारे गुरे वाहतूक करुन अवैधरित्या निर्दयतेने कोंबून प्राण्याना इजा होईल अशा प्रकारे वाहतुक करीत असतांना मिळुन आले. म्हणुन वरील दोघा आरोपीविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं.२०२/२०२५ भारतीय दंड संहिता प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१)(घ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नरेंद्र विसपुते हे करीत आहेत.
फोटो — कजगाव येथे याच वाहनात गुरे कोंबलेले दिसुन आले.