देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हा महिला टिमने आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी यांची घेतली भेट ; निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हा महिला टिमने आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी यावल यांची गुरुवार ६जून रोजी भेट घेतली घेतली .

भेटी दरम्यान आदिवासी पाड्यांवरील समस्या, रेशनकार्ड,आधार कार्ड, घरकुल, आरोग्य सुविधा व इतर सर्वं समस्यां संदर्भात भुसावळ जिल्हा महिला टिमने अर्धा तास चर्चा केली प्रसंगी निवेदन सादर केले . यावेळी ऍड जास्वंदी भंडारी, ऍड चित्रा ताई आचार्य,ऍड जयश्रीताई देशमुख व ऍड मंजुषा कुलकर्णी व विरसिंग वसावे सहभागी झाले होते .

प्रकल्प अधिकारी पवार यांनी त्यांच्या प्रत्येक विभागातील प्रमुख यांनाही या चर्चेत बोलावले व ज्या पाड्यावरील घरकुल मंजूर झाले नसतील ती यादी दिली .व त्यांनाही घरकुल मिळतील असे आश्वासन दिले 6000 घरकुल यावल तालुक्यात मिळणार आहेत . रेशनकार्ड व आधारकार्ड जातींचे दाखले ही सर्वांना मिळतील व आरोग्य सुविधा म्हणून चोपडा व रावेर साठी एक एक ॲम्ब्युलन्स मिळणार असल्याचे सांगितले ज्या ही समस्या असतील त्या सोडविण्याचे साठी प्रयत्न करू असे सांगत त्यांनी देवगिरी कल्याण आश्रमाकडुनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली . ज्या ठिकाणी शाळा नाही त्या मुलांना आश्रम शाळेत प्रवेशासाठी त्यांची टिम प्रयत्न करणार आहे प्रकल्प अधिकारी यांच्या भेटीनंतर डोगरदे,हरिपुरा आश्रम शाळा यांची पाहणी करण्यात आली .