भुसावळ (प्रतिनिधी ) – १२१५० दानापूर–पुणे एक्सप्रेस गाडीला तांत्रिक बिघाडामुळे विलं भुसावळ स्थानकात प्रवाशांना ‘स्क्रॅच रेक’मध्ये यशस्वीरीत्या स्थलांतरित करण्यात आले

दिनांक 05.06.2025 रोजी 12150 दानापूर–पुणे एक्सप्रेस गाडीला आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गाडी विलंबित झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी, भुसावळ स्थानकात गाडीतील सर्व प्रवाशांना ‘स्क्रॅच रेक’मध्ये सुरक्षितरीत्या व सुरळीत हस्तांतरित करण्यात आले.
ही स्क्रॅच रेक २२ डब्यांची असून, त्यामध्ये खालीलप्रमाणे कोच रचना होती: ९ स्लीपर क्लास, ६ थ्री-टियर एसी, २ टू-टियर एसी, २ जनरल सेकंड क्लास डबे
गाडी आगमन व प्रस्थान :
भुसावळ स्थानकावर ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सकाळी १०:१० वाजता आली. प्रवाशांचे यशस्वी स्थानांतरण झाल्यानंतर, गाडी सकाळी १०:४७ वाजता पुणेच्या दिशेने रवाना झाली.
अधिकाऱ्यांची उपस्थिती: यावेळी भुसावळ स्थानकात वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त स्टेशन वर उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा दल (RPF) व वाणिज्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाकडून समन्वयपूर्ण व्यवस्था:
भुसावळ येथे केटरिंग सोयीसाठी: केळी – ५०० डझन, पॅकेज्ड पिण्याचे पाणी – १८० बॉक्स, चहा – १७०० कप, वडा पाव – १२५०, समोसा – १२५०
प्रवासी सहाय्यता

:२५ लायसन्सधारक हमाल प्रवाशांच्या सामानासाठी नियुक्त, वाणिज्य व आरपीएफ विभागातील ४८ कर्मचारी तैनात, प्रत्येक डब्याकरिता तीन समर्पित कर्मचाऱ्यांची टीम नेमण्यात आली आणि ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या सामानांची रेल्वे कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक काळजी घेतली.
या गाडीत एकूण २२५० प्रवाशांना विशेष गाडीत बसवण्यात आले. सर्व प्रवाशी सुरक्षित आणि सामान सहित बसल्याची खात्री करून गाडी पुणे कडे रवाना करण्यात आली.
मनमाड स्थानकावर पुढील सहाय्यता: मनमाड येथेही प्रवाशांना नाश्ता व पिण्याचे पाणी पुरविण्यात आले.

भारतीय रेल्वे प्रवाश्याभिमुख सेवेसाठी सदैव तत्पर असून, कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वचनबद्ध आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेस व सेवेस सर्वोच्च प्राधान्य देते. या अनपेक्षित परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देत प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी उत्कृष्ट समन्वय साधला.


