भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिवस साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण या दिनाचे औचित्य साधून विभागीय रेल्वे कार्यालय ते भुसावळ रेल्वे स्टेशन दरम्यान पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅलीमध्ये विभागीय रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, भारत स्काऊट अँड गाईडचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

यावेळी भारत स्काऊट अँड गाईडच्या सदस्यांनी पर्यावरण संरक्षणावर आधारित प्रभावी नुक्कड नाटक सादर केले. या नाटकाद्वारे प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम व सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

याच उपक्रमात रेल्वे स्कूल, भुसावळ येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( तांत्रिक) श्री एम के मीना, सर्व शाखांचे अधिकारी, कर्मचारी, भारत स्काऊट गाईड चे सदस्य, विद्यार्थी सहभागी होते.