सामाजिक दायित्व ; भुसावळच्या श्री रिदम हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा एकदिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीसाठी

भुसावळ (प्रतिनिधी )-
जगात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. या जागतिक संकटाने भारताला सुद्धा ग्रासले आहे. या आपत्तीच्या प्रसंगी शासन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
यालढ्यात आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन शासनाने केले होते. कर्तव्य म्हणून श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनि स्वेच्छेने आपले एकदिवसाचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेऊन बुधवार ८ रोजी तहसीलदार दीपक धिवरे यांच्याकडे एसबीआय चा धनादेश क्रमांक १४३६२८ सुपूर्द केला या प्रसंगी सुग्णालयाचे डॉ. नितीन पाटिल , डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. महेश पांगळे,डॉ. कुशल पाटील, श्री रिदम मेडिकलचे गौतम चोरडिया उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनि रक्तदान करण्यासाठी आवाहन केले असता शहरातील समाजसेवकांच्या सहकार्याने नुकतेच श्री रिदम रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच रुग्णालयातर्फे पोलिसांना मास्कदेखिल वाटप करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान रुग्णांना मोफत भोजन व्यवस्थासुद्धा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *