भुसावळ (प्रतिनिधी) – समजविण्याचे वाईट वाटल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात काठी ने मारहाण करून जखमी केल्याची घटना येथील बी झेड हायस्कूल जवळ घडली . याबाबत बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेख जुबेर शेख अलीम पिंजारी (वय 25 ) राहणार नुराणी नगर ग्रीन पार्क भुसावळ यांनी फिर्याद दिली की , आरोपी शेख रिजवान शेख अख्तर राहणार नवीन बी.झेड. हायस्कुल हा नेहमी पुतनीचे नाव घेतो याकरीता त्याला दिनांक 7 एप्रिल रोजी 1 वाजेच्या सुमारास समजविण्यात गेले असता संशयीत आरोपी शेख रिजवान शेख अख्तर यास वाईट वाटल्याने त्याने फिर्यादिस शिवीगाळ करून त्यास काठीने डोक्यात मारहाण करून दुखापत केली . याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात
गु.र.न. 190/2020 भाग 5 भादवी कलम 324,504,506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



