भुसावळातील रस्त्यांवर संस्कृती फाउंडेशनच्यावतीने कोरोनाबद्दल जनजागृती ; नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन ; फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे हा रोखण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासियांना घरातच राहण्याचे सांगितले असून संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरू आहे. मात्र या परीस्थितीचे गांभीर्य न ठेवता अनेक नागरीक अजूनही घराबाहेर विनाकारण पडून गर्दी करून लॉकडाऊनचे उल्लंघण करीत आहेत यामुळे आपल्या परीवारातील सदस्यांचे जीव धोक्यात घालत आहेही गंभीर बाब लक्षात येत नाही , अश्या परीस्थितीत नागरीकांनी घरी राहण्यासाठी पोलिस प्रशासन त्यांच्या पध्दतीने कार्य करीत आहेत. सामाजिक जनजागृती अधिकाधिक व्हावी ह्या उद्देशाने युवा क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या नेहरू युवा केंद्र संलग्न संस्था संस्कृती फाउंडेशन ह्यांच्या मार्फत रस्त्यांवर चित्र काढून तसेच संदेश देवून नागरीकांना घरात राहण्यासाठी विनंती केली जात आहे. सामाजिक संदेशातून जनजागृती
नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत, प्रकल्प प्रमुख मनोहर झांबरे, पवन कोळी, पियुष गवळी, राहील पटेल, हर्षवर्धन बाविस्कर, मंगेश भावे, जितेश टाक, आकाश बस्ते, आरीफ तडवी, तेजस गांधेले, संजय बडगुजर इत्यादी युवकांनी बुधवार ८ रोजी भुसावळ शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गांवर कोविड-१९ या आजाराबद्दल सामाजिक संदेश देत जनजागृती केली. यात प्रामुख्याने महात्मा गांधी चौक, यावल रोड, सरदार वल्लभभाई पटेल चौक, जुना सातारा, अहिल्याबाई होळकर चौक, बाजारपेठ पोलिस स्टेशन समोर, अष्टभुजा देवी मंदिरा समोर, नाहाटा चौक इत्यादी प्रमुख चौकात कोरोना बद्दल जनजागृती चित्र काढण्यात आले. शहरातील नागरीकांना घरात राहून सुरक्षित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक संदेश देतांना देखील संस्थेच्या सर्व सदस्यांनी नियमांचे पालन करत तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर ठेवूनच रंगरंगोटी केली. संस्थेच्या या उपक्रमाचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड तसेच भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी कौतुक केले.
संपूर्ण देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे ह्यावर पर्याय म्हणजे फक्त दिलेल्या सुचनांचे पालन करत नागरीकांनी विनाकारण बाहेर न पडता घरातच राहावे यातच त्यांचे भले आहे. या अनुषंगाने छोटासा प्रयत्न म्हणून रस्त्यांवर सामाजिक संदेश देण्यात आले आहे, नागरीकांनी त्यांचे पालन करत घरातच राहून सुरक्षितता पाळावी, असे आवाहन संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *