भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नाहाटा महाविद्यालय परीसरातील श्री.साईबाबा मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून शहरातील गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यात येत आहे. यात 1 किलो तेल, साखर, चहा पावडर, 5 किलो बटाटे, मिरची, हळद, कांदे, डाळ, 10 अंघोळीचे साबन यांचा समावेश आहे. आजपावेतो सुमारे 1200 जणांना जीवनाश्यक वस्तू देण्यात आल्याच असून मदतीचा ओघ सुरुच आहे व राहिल .कोणताही गरजु वंचित राहणार नसल्याची खात्री साईबाबा मंदीर ट्रस्टच्या वतीने युवानेते सचिन चौधरी यांनी दिली. विशेष म्हणजे ट्रस्टी अध्यक्ष माजी आमदार संतोष चौधरीं यांनी ही घरपोच
सेवा उपलब्ध करून दिल्याने गर्दी वा कोणताही गोंधळ होत नाही व सर्व गरजूंना याचा लाभ मिळत असल्याने नागरिकांनी या कार्याचे भरभरुन कौतुक करीत मनःपूर्वक आभार मानले आहे .



