भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा शिवारात प्रल्हाद टाक यांच्या शेताच्या बाजूला रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी 12.20 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी फिरोज छट्टु गवळी हा हातभट्टी महू ,नवसागर, गूळ मिश्रीत रसायण ,बाळगुन जळत्या भट्टीवर दारू तयार करत असतांना आढळून आला त्याचे जवळ रसायनचे 08 ड्रम मध्ये 1500 लिटर, आणि गावठी हात भट्टीची 25 लिटर तयार दारू असे अंदाजे किंमत 51,250 रुपयांचे मालासह मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे अवमानता केली म्हणून भादवि कलम 270, 271, 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार, सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, पो हे कॉ अजय माळी, विठ्ठल फुसे, संजिव मोंढे, प्रवीण पाटील, पोना विजय पोहेकर यांनी केली आहे.



