मोदींच्या आवाहनाला जनतेचा प्रतिसाद ; पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी ही लावला दिवा

जळगाव (प्रतिनिधी )-
कोरोणामुळे पसरलेला अंधार दूर करण्याकरीता, तिमिराकड़ून तेजाकडे जाण्या करीता ,कोरोना विरुद्धाचा हा लढा एकजुटिने जिकण्यासाठी आज जनतेने एकत्र येवून दिवे लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे . जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यां सर्व लढवैय्या यंत्रणेप्रती आभार व्यक्त करण्याकरीता दिवे लावून आदर व्यक्त केला . भारतावर ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्या वेळेला एकजुटीचे दर्शन झाले आहे .
राज्याच्या मंत्रिमंडळातील पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी सुद्धा आपल्या घराबाहेर दिवा लावून हे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी भवानी चरणी प्रार्थना केली . कोरोना विरुद्ध लढणाऱ्या लढवैय्या समाजरक्षकांचे आभार मानले .व दिवा लावून मोदींनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *