रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी केली मनमाड-जळगाव तिसऱ्या मार्गाची सखोल तपासणी

भुसावळ( प्रतिनिधी )- दिनांक ४ मार्च २०२५ रोजी मनोज अरोरा रेल्वे सुरक्षा आयुक्त सेंट्रल सर्कल यांनी मनमाड-जलगाव तिसऱ्या मार्गाच्या तपासणीअंतर्गत आज सखोल निरीक्षण केले. या निरीक्षणामध्ये सुरक्षा उपायांचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले.

निरीक्षणादरम्यान, त्यांनी गालन आणि नगरदेवळा स्थानकांदरम्यान असलेल्या पूल क्रमांक ३५६/१ व पूल क्रमांक ३५४/३ तसेच वक्र क्रमांक ७५ बी तिसऱ्या मार्गाची आणि पूल क्रमांक ३५९/०१ ची तपासणी केली. याशिवाय, पाचोरा-गालन विभागातील पूल क्रमांक ३६५/२ आणि पाचोरा स्थानकाचीही सखोल तपासणी करण्यात आली.
कजगाव येथे स्टेशन कार्यालय , रिले रूम, स्टेशन परिसर सखोल तपासणी करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण तपासणी दरम्यान, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुख्यालय येथील प्रमुख अधिकारी , विभागाच्या उपमुख्य अभियंता निर्माण तसेच भुसावळ विभागातील संबंधित शाखेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा उपाय व संरचनांच्या बारकाईने तपासणी करून, तिसऱ्या मार्गाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना याबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यात आली.

रेल्वेच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची असून, या तपासणीच्या माध्यमातून विविध तांत्रिक व संरचनात्मक बाबींवर भर देण्यात आला.