आझमी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिशिर जावळे यांच राज्य पाल यांचेसह मुख्यमंत्र्यांना पत्र..

भुसावळ (प्रतिनिधी ) –

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंजगेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतेच अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

मुघल सम्राट औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा म्हणजेच आताचा म्यानमारपर्यंत पसरली होती. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हटलं जात असे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती.
देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं उभारली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती, असं अबू आझमी यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या देशात राहून क्रूरनिर्दयी औरंगजेबाची स्तुती सुमने उधळणाऱ्या त्यांचा समर्थक असणारे, देशद्रोही विधान करणारे, सामाजिक तेढ निर्माण करणारे अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा. यांची आमदारकी त्वरित रद्द करण्यात यावी. अशा आशयाचे पत्र भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.