भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे शाखा भुसावळ तर्फे
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या कन्येची कोथळी येथील यात्रेत समाजकंटक टवाळखोर गुंडांकडून छेड काढण्यात आली याचा घटनेचा निषेध करून त्या साठी समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणुन प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
भोरगाव भुसावळ शाखेचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी याबाबत बोलताना सांगितले की हे केवळ लेवा समाजासाठी नाही तर समाजातील सर्वच माता भगिनींच्या अस्मितेचा अपमान करणारी बाब आहे…अशाच प्रवृत्ती दुर्लक्ष केल्यास पुढे घातक ठरू शकतात. यावर कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे व
या गंभीर घटनेचा भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे जाहीर निषेध नोंदवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले ….
या प्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे सचिव सुभाष भंगाळे यांनी निवेदन तयार करुन प्रांत अधिकारी यांना पुढील कार्यवाही साठी विनंती केली.
या प्रसंगी आरती चौधरी यांनी सांगितले अलिकडे अशा घटनांचे प्रमाण वाढले असून अशा संतापजनक घटनेबाबत शासनाला कडक कारवाईची विनंती केली.
हरीश फालक, यांनी सांगितले की भोरगाव लेवा पंचायत ही सामाजिक संस्था असून अशी घटना कोणत्याही मुलगी, महिलेच्या बाबतीत घडू नये. यासाठी आमचे प्रयत्न असतात असे त्यांनी सांगितले
या प्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे संचालक इतर संचालक उपस्थित होते.
महेश फालक, अनिल वारके, परीक्षित ब-हाटे,
आर. जी. चौधरी, शरद फेगडे, चेतन पाटील, निळकंठ फालक,
अरूण चौधरी, मंगला पाटील कावेरी ललित
संजय पाटील, लालचंद पाटील, धीरज पाटील
चंद्रकात चौधरी
हजर होते.



