भुसावळ – रेल्वे प्रशासनाने महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्ग बदलाच्या गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे –

आपल्या नियोजित मार्गाऐवजी प्रयागराज छिवकी येथून जाणाऱ्या गाड्या –
१) गाडी क्रमांक ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर पवन एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी दिनांक १८.०२.२०२५ ते २८.०२.२०२५ पर्यंत.
२) गाडी क्रमांक ११०६२ जयनगर -लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस जयनगर येथून सुटणारी दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ पर्यंत.
३) गाडी क्रमांक ११०३३ पुणे -दरभंगा एक्सप्रेस पुणे येथून सुटणारी दिनांक १९.०२.२०२५ आणि २६.०२.२०२५ रोजी.
४) गाडी क्रमांक ११०३४ दरभंगा -पुणे एक्सप्रेस दरभंगा येथून सुटणारी दिनांक २१.०२.२०२५ आणि २८.०२.२०२५ रोजी.
या गाडयांना प्रयागराज छिवकी येथे तात्पुरता थांबा प्रदान केला आहे.
आपल्या नियोजित मार्गाऐवजी कानपुर, लखनऊ मार्ग येथून जाणाऱ्या गाड्या
१) गाडी क्रमांक ११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी कामायनी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, जौनपूर मार्गे वाराणसी पोहचेल.
२) गाडी क्रमांक ११०७२ वाराणसी – लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी जौनपूर, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल.
३) गाडी क्रमांक २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कॅट एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५, २३.०२.२०२५ आणि २५.०२.२०२५ रोजी गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ मार्ग अयोध्या कॅट पोहचेल. .
४) गाडी क्रमांक २२१३० अयोध्या कान्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १९.०२.२०२५, २४.०२.२०२५ आणि २६.०२.२०२५ रोजी गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल.
५) गाडी क्रमांक १२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस- बनारस एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, उन्नाव मार्ग बनारस पोहचेल.
६) गाडी क्रमांक १२१६८ बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ रोजी गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी उन्नाव, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल.
७) गाडी क्रमांक २२१७७ मुंबई -वाराणसी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, उन्नाव मार्ग बनारस पोहचेल.
८) गाडी क्रमांक २२१७८ वाराणसी -मुंबई एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी उन्नाव, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे मुंबई पोहचेल.
९) गाडी क्रमांक २२१०४ अयोध्या कॅट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ आणि २५.०२.२०२५ रोजी गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल.
१०) गाडी क्रमांक २२१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या कॅट एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक २४.०२.२०२५ रोजी आपल्या नियोजित मार्गाऐवजी बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ मार्ग अयोध्या कॅट पोहचेल.
११) गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २७.०२.२०२५ पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ़, जंघई मार्गे गोरखपूर पोहचेल.
१२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस प्रवास सुरू दिनांक १८.०२.२०२५ ते २८.०२.२०२५ पर्यंत गाडी आपल्या नियोजित मार्गाऐवजी जंघई, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ़, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस पोहचेल.
प्रवाशांना विनंती आहे की आपल्या प्रवासाच्या नियोजनात वरील मार्ग बदलांचा विचार करावा. अधिक माहितीसाठी प्रवासी संबंधित रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.


