जळगाव : दोन वेगवेगळ्या कंपनीत घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केल्या आहेत. साई प्रेरणा इंडस्ट्रीज आणी महालक्ष्मी युनी एक्झिम या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.

साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतुन 3 लाख 3 हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या व अँल्युमीनीयमच्या वायरींग, ईलेक्ट्रीक मोटार, हीट कंट्रोलर, पॅनल, लोखंडी पॅनल, लोखंडी बिम रोल, दोन गेअर बॉक्स, ट्रॉन्सफॉर्मर, प्लास्टीक व्हर्जीनच्या दाण्याने भरलेल्या 30 बॅग असा मुद्देमाल चोरी झाला होता. तसेच महालक्ष्मी युनी एक्झीम कंपनीतील 50 हजार रुपये किंमतीचे 2 किलो चांदीचे साहीत्य व 60 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी झाला होता.


