खंडाळा (वार्ताहर) – तालुक्यातील साकरी येथे महिलांनी पुढाकार घेवून गावात फिरून कोरोना या विषाणू व्हायरस विषयी गावातील महिलांना व नागरिकांना जनजागृती करून व या कोरोना व्हायरस पासून कश्या प्रकारची काळजी घ्यावी व घरातच थांबावेअसे सांगत उन्हाळ्यात महिलांची जोरदार लगभग पापड , बिबड्या ,कुरडई, बनवण्या करीता सुरु असते . मात्र यंदा महिलांनी पापड बनविन्याचे मोहात पडू नका ,महिला एकत्र आल्यावर हा कोरोना विषाणूचा एकमेकांना संसर्ग होऊ शकतो म्हणून काही दिवस हे काम बंद करावे व महिलांनी घरातच राहावे, संचारबंदी असल्याने एकत्र दिसल्यास गुन्हा नोंद होऊ शकतो असे ही या वेळी सांगण्यात आले. गावातील नागरिकांनी गरजे पुरतेच तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून घरा बाहेर पडावे असेही आवाहन केले .
या जनजागृती मध्ये विशेष म्हणजे सर्व महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी सरपंच कांचन भोळे , अंगणवाडी सेविका दीपाली चौधरी, दीपाली बोदर, मिना नेहते, वत्सला सुरवाडे,कविता सुरवाडे, आशा वर्कर गोदावरी भारबे, सुनंदा चौधरी,अनिता नेहते,चारुलता राजपूत, प्रगती चौधरी, यांनी जनजागृती करून आवाहन केले.



