शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव –
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रूग्ण आढळून न आल्याने निर्धास्त असणार्‍या जळगावकरांना धक्का देणारी बातमी समोर आली असून शहरातील एका रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
जळगावात आजवर अनेक संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी अद्याप कुणी पॉझिटीव्ह आला नव्हता. तथापि, आज शनिवार रोजी सायंकाळी एका रूग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *