दिपनगर वसाहतीत मुंबई येथून आलेल्या दोन संशयीतांमुळे खळबळ ; सुरक्षाविभागाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ दीपनगर विद्युत केंद्र येथील कर्मचारी वसाहतीत शुक्रवारी रात्री मुंबई येथून आलेल्या दोघां कोविड 19 संशयीत रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली . मात्र या दोघांना सुरक्षाराक्षकांनी हटकल्याने ही बाब लक्षात आली व पुढील अनर्थ टळला.
दीपनगर वसाहतीत हे दोघे जण मुंबईहून दाखल झाले होते. त्यांच्या हातावर सेल्फ कॉरनटाइन म्हणून शिक्का होता. व त्यांना सर्दी व खोकला सारखा सुरु होता व खूप त्रास होत होता.सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले .त्वरित बिल्डिंग मधील राहिवाशियांनी प्रसाशनास कळविल्यामुळे त्यांना हलविण्यात आले .
वसाहतीत कुणाकडे बाहेरून व्यक्ती आले असतील तर दक्ष राहून व्यवस्थापनास कळवावे,जेणेकरून योग्य ती व्यवस्था करता येईल व ज्यांच्या हातावर शिक्का मारलेला आहे त्यांना प्रवेश देवू नये तसेच ज्यांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे त्यांनी १४ दिवस घरातच राहावे.शक्यतो बाहेरील व्यक्तीस वसाहतीत बोलावू नयेअसे आवाहन
दिपनगर मधील रहिवासीयांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन नितिन पुणेकर यांनी केले आहे .
मुंबई येथून आलेल्या दोन्ही व्यक्तिना आपल्या हायवे गेटवर ड्युटीवर असलेल्या सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांच्या सतर्कपणामुळेच परस्पर बाहेर काढण्यात आले त्यामुळे सुरक्षा यंत्रणेचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *