भुसावळात संचारबंदि मध्ये चोरुन हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी ) संचारबंदी दरम्यान शहरातील सर्व दुकाने बंद असूनही चोरट्या मार्गाने वाल्मिक नगर भागात हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यावर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून भुसावळ शहरात भीमराव जानू इंगळे वय 75 राहणार वाल्मिक नगर भुसावळ हा संचारबंदीचा फायदा घेऊन हातभट्टी दारूची चोरटी विक्री करीत होता.पोलिसांनी सापळा रचून आरोपिकडून 20 लिटर हातभट्टी दारू ताब्यात घेण्यात आली आहे.कारवाई
पोहेकॉ.प्रभाकर चौधरी,पोना महेश चौधरी,पोना. यासिन पिंजारी,पोना. रविंद्र बिऱ्हाडे,पोना .रमण सुरकळकर,पोना. उमाकांत पाटील,पो कॉ .कृष्णा देशमुख, पो कॉ.विकास सातदिवे ,पो कॉ.ईश्वर भालेराव,पो कॉ. तुषार पाटील,पो कॉ. प्रशांत परदेशी,पो कॉ.सुनील साळूखे , पोकॉ.योगेश महाजन,दीपक कापडणे अशांनी मिळून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *