निंभोरा बुद्रूकला एकाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील निंभोरा बुद्रूक येथील रहिवासी धनराज पंडीत सपकाळे (38) यांनी त्यांच्या वडीलांच्या घरात जावून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार २० मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे पाठविण्यात आला. हवालदार प्रेमचंद सपकाळे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *