भुसावळ – सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असतांना एकमेकांशी जोडणे गरजेचे असून यासाठी वेळ द्यावा विचारांचे आदान प्रदान करा, जे मानसिक दृष्ट्या खचले आहे त्यांना प्रेरणा द्या ऊर्जा द्या आर्थिक सहकार्य करून त्यांच्या मनातला अंधार दूर करा असे आवाहन येथील स्त्रीरोग तज्ञ तथा सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुवर्णा गाडेकर यांनी केले . औचित्य होते आत्मसन्मान फाउंडेशन , बोदवड प्रमिलाताई व मोहनराव परिवार मनोरुग्ण पुनवर्सन केंद्र , नाडगाव रोड बोदवड येथील मनोरुग्ण बंधू भगिनी यांच्या जिवनात दिवाळीनिमित्त फराळ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे …यावेळी डॉ सुवर्णा बोलत होत्या .यावेळी त्या म्हणाल्या की , कुटुंब सुद्धा प्रसंगी घरातील मनोरुग्ण व्यक्ती वा रुग्ण यांना टाळतात समाजातल्या काही घटकांची सुद्धा संकुचित वृत्ती अश्याना जगण्यासाठी तुच्छ समजतात अश्या या निरागस व्यक्तीना मदत केल्यानंतर ते समाजाचे ऋण व्यक्त करू शकत नाही किंवा कौतुक करू शकत नाही यांचेकरिता सक्षम नारी फाउंडेशनच्यावतीने सदैव योग्य ते सहकार्य करीत राहणार असल्याची ग्वाही डॉ सुवर्णा गाडेकर यांनी दिली .

आत्मसन्मान फाउंडेशन च्या कार्याचा इतिहास रचला जाईल त्यात आमचा सक्षम नारी फाउंडेशनचाही खारीचा वाटा असेल असेही त्या यावेळी म्हणाल्या . समाजातील दात्यांना आवाहन केले की ,देणं म्हणजे केवळ पैसे देणं नव्हे, जेव्हा विचारांचं श्रमाचे देणे होते , तेव्हा काही तरी उन्नती होते जगामध्ये जे जे चांगले काम होते ते वेड्याकडून होते या मनोरुग्ण बांधवा करीता एक वेडा धावला त्यासाठी अनेक वेडे मदत करीत आहे आनंद देणाऱ्या गोष्टी आत्मसाद करा व समाजातील अश्या व्यक्तीना जगण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करा असे पुनश्च आवाहन केले .
मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तीना सुद्धा जगण्याचा अधिकार असतो असा ठाम निश्चय करून सन 2013 पासून आत्मसन्मान फाउंडेशनने कार्याची सुरवात केली अध्यक्ष विजय पाटील यांचेसह सचिव डॉ अमोल पाटील , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेंद्र पाटील प्रा भगवंत माळी , रवी माळी आकाश बावस्कर , सतीश पाटील , ऋषिकेश शर्मा ,शरद पाटील , मनीषा गजानन टेणी यांनी अहोरात्र फाउंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरू केले व आजतागायत करीत आहे . आज संस्थेच्या माध्यमातून अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले रुग्णाना ने आण करण्यासाठी भुसावळच्या सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा व सहकारी यांनी मिळून व्हॅन भेट देवून अती मोलाचे सहकार्य केले अशी भावना आत्मसन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त करून सक्षम नारी फाउंडेशन सारख्या दात्यामुळेच आमचेही मनोबल वाढते अश्या भावना व्यक्त करून आत्मसन्मानचे कार्य व माहिती प्रास्ताविकात सांगितली .
यावेळी सक्षम नारी फाउंडेशन भुसावळच्या डॉसुवर्णा गाडेकर, संगिता जगताप, सुनंदा डांगे,विजया पाटील,किरण जाधव, संघमित्रा, वंदना कांबळे, माधुरी पालक, गायत्री विसपुते.शितल भालेराव,संघमित्रा ढाकणे , पारुल वर्मा , मंजू शर्मा , उज्वला बागुल , यांचेसह सक्षम फाउंडेशन च्या सदस्या उपस्थित होत्या .

[


