दिवाळी/छट पूजा उत्सवानिमित्त पुणे आणि दानापूर दरम्यान 2 अतिरिक्त अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवणार ; दिवाळी/छट पूजा उत्सव विशेष गाड्यांची एकूण संख्या आता ५८३

मुंबई –

दिवाळी / छट पूजा सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे पुणे आणि दानापूर दरम्यान 2 अतिरिक्त अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवणार आहे.

या सेवांमुळे मध्य रेल्वेच्या दिवाळी/छट पूजा सणांसाठी चालवल्या जाणाऱ्या / नियोजित रेल्वे सेवांची संख्या आता ५८३ झाली आहे.

पुणे-दानापूर अनारक्षित स्पेशलचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

01419 अनारक्षित स्पेशल पुणे 28.10.2024 रोजी सकाळी 10.50 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 23.30 वाजता दानापूरला पोहोचेल. (1 सेवा)

01420 अनारक्षित स्पेशल 29.10.2024 रोजी 23.50 वाजता दानापूरहून निघेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 09.55 वाजता पोहोचेल. (1 सेवा)

थांबे:दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपुर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा.

रचना: (एकूण -21 ICF कोच) 15 स्लीपर क्लास , 6 जनरल सेकंड आणि 2 गार्ड कम ब्रेक व्हॅनसह(स्लीपर कोच अनारक्षित म्हणून चालतील).

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

गैरसोय टाळण्यासाठी कृपया वैध तिकिटांसह प्रवास करा.