भुसावळ – भुसावळात देवगिरी वनवासी कल्याण आश्रम व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील साकेगाव व फुलगाव येथे राणी दुर्गावती यांची 500 वी जयंती साजरी करण्यात आली . यानिमित्त यानिमित्त फुलगाव व साकेगाव , वराडसीम व गोंभी येथील आदिवासी व भिल्ल वस्तीवर दिवाळी फराळ व कपडे व महिलांना साडी वाटप करून यासर्व बांधवांची दिवाळी गोड केल्याची भावना या बांधवांनी व्यक्त केल्या .


कार्यक्रमाचे प्रारंभी राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले . यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ निलेश भिरुड ,अँड जास्वंदी भंडारी ,काशिनाथ बारेला सर ,सदस्या अँड जयश्री देशमुख यांनी मार्गदर्शन केले .व देवगिरी कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती दिली

यानिमित्त फुलगाव व साकेगाव , वराडसीम व गोंभी येथील आदिवासी व भिल्ल वस्तीवर दिवाळी फराळ (चकली शेव चिवडा, शंकरपाळी मोहनथाळ) वाटप करण्यात आले

यावेळी अँड मंजुषा कुलकर्णी ,पत्रकार उज्वला बागुल , स्वाती भोळे , अनिता ठाकरे , रेखा यांचेसह कल्याण आश्रम सदस्य उपस्थित होते .



