भुसावळ विधानसभा मतदारसंघात नियुक्त खर्च निरीक्षक यांची आढावा बैठक.

 

भुसावळ – १२ -(अ.जा) भुसावळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुशंगाने भुसावळ उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात आज दि २३/१०/२०२४ रोजी दुपारी 2 वाजता आयोजित सभेत खर्च निरीक्षक हरकेश मीना सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.सेक्टर अधिकारी ,नोडल अधिकारी , एफएसटी , व्ही व्ही टी,व्ही एसटी, होम वोटिंग टीम , आणि आचारसंहिता कक्षातील विविध कक्षांना उमेदवारांच्या खर्चाविषयी बाबींवर विशेषकरून लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. सदरील बैठकीस
निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार श्रीमती नीता लबडे ,निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर उपस्थित होते .