भुसावळ रेल्वेस्थानकावर अतिरेक्यांच्या अटकेचा थरार; मॉकड्रील कळताच सर्वांनी सोडला सुटकेचा श्वास :

भुसावळ – भुसावळ रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला.. अशी दोन जणांकडून अतिरेकी हल्ला केल्याची माहिती मिळते… अन एकच धावपळ सुरू होते .रेल्वे स्थानकावर अचानक उदभवलेल्या या परिस्थीतिचा सामना करण्यास पोलीस सतर्क होतात … पोलीस नियंत्रण कक्षाकडून अतिशिघ्र कृती दलाला परिस्थिती हाताळण्याच्या सुचना दिल्या जातात. त्याबरोबरच बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथक, भुसावळ बाजारपेठ पोलीस, सीआरपी, आरपीएफ, शीघ्र कृती दलाचे पथक रेल्वे स्थानकात पोहचून कारवाईला सुरवात केली जाते. काही वेळातच रेल्वे स्थानकात घातपात घडवण्याच्या इराद्याने दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांना दहशत विरोधी पथक जेरबंद करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवते. हा सर्व थरार उघड्या डोळ्यांनी पाहात असतानाच प्रवासी सह फलाटावरील नागरिक यांची त्रेधा उडते मात्र हे मॉकड्रील असल्याचे लक्षात येताच भुसावळकरांनी सुटकेचा श्वास सोडला आणि पोलिस यंत्रणादेखील सज्ज असल्याचे लक्षात आल्याने सुरक्षेची खात्रीदेखील झाली..