आंबेडकरी वाईस मीडिया फोरमच्या वतीने गरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

भुसावळ – शहरा पासून जवळ असलेल्या यावल तालुक्यातील तापी नदी किनारी वसलेल्या अकलूद शिवारातील ,पब्लिक इंटरनॅशनल स्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आंबेडकरी वाईस मीडिया फोरम या पत्रकार संघटनेच्यावतीने फोरमचे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार, महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष राजेश तायडे ,संस्थेचे ,सुनील आराक, विनोद सुरवाडे यांच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण इंगळे यांना गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी शालेय साहित्य वाटण्यासाठी देण्यात आले .
प्रसंगी प्रवीण इंगळे सरांनी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले . तसेच शैक्षणिक संस्था ही गरीब विद्यार्थ्यांसाठी असल्याने गरीब विद्यार्थ्यांना समस्त दानदात्यांनी तन-मन धनाने सहकार्य करावे असे आव्हान संस्थेचे मुख्याध्यापक प्रवीण इंगळे यांनी केले आहे .
प्रसंगी ज्ञानेश्वर धनगर सर गुलशन प्रजापति सर उपस्थित होते