भुसावळ (प्रतिनिधी )-
जगभरात धुमाकूळ घालणार्या कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील १४ रेल्वे स्थानकांचे तिकीट दर १० रुपयांवरून ३० रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याआधी भुसावळसह आठ रेल्वे स्थानकांचे तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले होते. रेल्वेच्या या निर्णयामुळे अनावश्यक गर्दीला आळा देखील घातला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह लासलगाव, निफाड, नांदगाव, चाळीसगाव, धुळे, पाचोरा, बोदवड, मलकापूर, नांदुरा, मुर्तिजापूर, रावेर, बर्हाणपूर तसेच नेपानगर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मचे तिकीट आता १८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ३० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



