भुसावळ (प्रतिनिधी )-
आज गरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांना जीवन जगत असताना अन्न ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती शासनाकडुन कमीदरात रेशनकार्डाच्या माध्यमातून मिळते परंतु सन २०१३ नंतरच्या बऱ्याच रेशन कार्ड धारकांना अजुनही धान्य वाटप करण्यात आलेले नाही, यामुळे सर्वसामान्य जनता परेशान आहे, तरी नागरीकरणाच्या समस्या त्वरीत सोडवाव्या यासाठी १६ मार्च रोजी तहसीलदार दीपक धिवरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु नागरिकांना पूरवठा विभागाच्या फेऱ्या कराव्याच लागल्या व कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून आज दिनांक १८ मार्च रोजी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील व नागरिकांनी लिखीत निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
वराडशीम येथील अक्षय सपकाळे, अमोल वाघ, रुखमींनी लोहार, चित्राबाई गायकवाड, शांताराम मोरे, कुऱ्हा येथील सचिन भामरे, भुसावळचे नरेश चत्रत, प्रशांत तावडे, लता चौधरी, आशा बाई निळे, लखन चौधरी यांनी प्रा.धिरज पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. विशाल ठोके, संजय भोई, शंतनू पाथरवट, किशोर भोई, अमोल पाटील हे उपस्थित होते.
यामध्ये असे सांगण्यात आले की सन २०१३ नंतर नवीन रेशनकार्ड काढलेल्या लोकांना रेशनचा माल मिळत नाही गेल्या सात आठ वर्षात नवीन रेशनकार्ड धारकांना धान्य मिळाले नाही तरी २०१३ पासुनच्या नवीन रेशन कार्ड धारकांना धान्य देण्यात यावा, त्यासाठी लागणारा १२ नंबर देण्यात यावा.
डेटा एन्ट्री ऑपरेटर अनुपस्थित:
ऑनलाइन नावे टाकणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर नेहमीच अनुपस्थित असल्याने ऑनलाइनची कामे पूर्ण झाली नाही. जळगाव विभागावरून नियुक्ती झालेले कर्मचारी उपस्थित नसतात, त्यांना सहा महिन्यांचा पगार दिलेला नसून याविभागात तीन जागा रिक्त आहेत असे प्राथमिक माहिती मिळाली. एकाच नायब तहसीलदाराकडे दोन अतिरिक्त टेबल असून १२१ दुकानाचा कामाचा ताण पडतोय अशी माहिती मिळाली आहे, यासर्व प्रकारचा त्रास मात्र नागरिकांना असून रोजनदारी कामे सोडून तहसील कार्यालय ते रेशनिंग दुकानाच्या फेऱ्या कराव्या लागतात असे नागरिकांचे म्हणणे होते.
पात्र रेशनकार्ड धारकांच्या न्याय व हक्कासाठी व्यापक स्वरूपात आंदोलन उभे करण्यात येईल -नागरीकांनी शिवसैनिकांशी संपर्क साधावा ;शिवसेनेचे आवाहन
यासर्व बाबींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदनाची प्रत पाठवली आहे असे शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले आहे.
कोरोना मुळे धान्य न देण्याची अफवा:
कोरोना विषाणू मुळे बोटाचे थंब घेतले जात नाही म्हणून धान्य मिळणार नाही अशी अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाते आहे. परंतु फक्त धान्य दुकानदाराच्या थंब (अंगठा) घेऊन नागरिकांना धान्य दिले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


