नगरसेवक मुकेश पाटील यांना अटकपुर्व जामीन मंजुर.

येथे शासकीय तिथीनुसार असलेल्‍या शिवजयंतीच्‍या मिरवणूकीत एका तरूणावर झालेल्‍या प्राणघातक हल्‍ला व जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी दाखल गुन्‍ह्‍यात भुसावळ न्‍यायालयाने नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती मुकेश नरेंद्र पाटील यांना अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.
नगरसेवक मुकेश पाटील व ईतरांविरुध्‍द दि.१९ फेब्रुवारी रोजी शासकीय तारखेनुसार शिवजयंतीदिनी मिरवणुकीत राखुंडे नामक तरूणावर जातिवाचक शिवीगाळ व प्राणघातक हल्‍ला केल्‍या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्‍यात गुरनं.र.नं.३०/२०२० कलम ३०७,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,आर्म अॅक्‍ट ४/२५ व अनुसूचित जाती जमाती अत्‍याचार कायदा कलम १०(३)अन्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. या प्रकरणी नगरसेवक मुकेश पाटील यांच्‍यातर्फे अटकपुर्व जामीनासाठी भुसावळ येथील अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
सदर अटकपुर्व जामीन अर्जावर आज बुधवार दि.१८ मार्च रोजी अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश एस.पी.डोरले यांनी नगरसेवक मुकेश पाटील यांना अटकपुर्व जामीन मंजुर करून शहर पोलीसांनी अटक केल्‍यास २५ हजाराच्‍या जातमुचलक्‍यावर सोडण्‍याचे आदेश दिले.सरकार तर्फे अॅड.भोंबे तर आरोपी तर्फे राजेंद्र टी.राॅय यांनी काम पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *