भुसावळ – येथील उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या सूचनेप्रमाणे लोकसभा निवडणुकीची मतदार संघाची यादी जाहीर करण्यात आली.

याबाबत मुख्य निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या सूचनेप्रमाणे मतदार संघाची यादी जाहीर करण्यात आली असून एक लाख ४१ हजार ६०२ स्त्री तर एक लाख ५२ हजार ४७९ पुरुष दिव्यांग दोन हजार दोनशे पन्नास तर तृतीयपंथी ३७ असे एकूण दोन लाख ९४ हजार ३१ मतदार आहेत.तर तीनशे चौदा एकूण मतदान केंद्र आहेत.मयत मतदार आठ हजार पाचशे वगळण्यात आलेले आहेत.नावात बदल झालेले मतदार एक हजार ८७५ तर स्थलांतरीत झालेले बारा हजार तसेच सारखे फोटो असलेले पाच हजार वीस असून यातील दोन हजार चारशे नावे रद्द करण्यात आली आहेत.एक वर्षात दहा हजार ५२६ नवीन मतदारांची नाव नोंदणी झालेली आहे.महिलांची नवीन मतदार नाव नोंदणी नऊशे एकोणत्तीस या मनाने पुरुष ५१.८४% तर स्त्री ४८.१४% व तृतीयपंथी ३७ अशी टक्केवारी आहे.यात एकूण बावीस हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत हा जिल्ह्याच्या मनाने फार मोठा उच्चांक आहे. आयोगाचा मुख्य भर १८ ते १९ वयोगटातील मुल – मुलींची संख्या कमी आहे.ज्या मुलींचे नवीन लग्न होवून आपल्या मतदार संघात आलेली आहेत त्यांनी नमुना सहा भरून नाव नोंदणी करून घ्यावी तसेच १८ ते १९ वयोगटातील मुल – मुलींची नमुना सहा भरून मतदान यादीत नाव नोंदणी साठी प्रयत्न करावा. यानंतर पुरवणी मतदान यादी बाकी आहे ती लवकरच प्रसिद्धी करण्यात येणार आहे. प्रशासन कालावधीत १८ ते १९ वयोगटाला गृहीत धरून मतदान वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी १२ भुसावळ विधानसभा मतदार संघ जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


