जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्षपदी प्रशांत भावसार यांची निवड

जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटना चे अध्यक्ष पदी प्रशांत भावसार यांची निवड

जळगांव ; – जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटना (म) जळगांव , जमनादास भाटिया (अध्यक्ष) यांचे अध्यक्षते खाली मिटिंग सपंन्न झाली. या मिटिंग मध्ये जमनादास भाटिया यांनी स्वइच्छेने राजीनामा दिला व तो स्वीकारण्यात आला. तसेच सर्व कार्यकारणी सभासद यांनी रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर एकमताने श्री प्रशांत राजेंद्र भावसार यांची जळगांव जिल्हा सरकार मान्य रेशन दुकानदार संघटना चे अध्यक्ष पदी निवड केली. यावेळी श्री प्रशांत राजेंद्र भावसार यांचे हार्दिक सर्वांनी अभिनंदन केले . या सभेला श्री जमनादास ली. भाटिया, सौ शुभांगी बिऱ्हाडे . आर आर बाविस्कर, व्ही बी खान, भिकन जोशी, सौ मंजुषा येवले, प्रकाश भंगाळे, गणेश गायकवाड, निलेश भावसार,कृष्णा गंगावणे, अजमल अली शेर अली, अंजना माळी, पंकज माळवी, भारती पाटील, भिका सोनवणे, विधी भाटिया, नितीन जे भाटिया अनिल बिहाडे हे उपस्थित होते.