चंद्रकांत जाधव ‘समाज गौरव’ पुरस्काराने सन्मानित :

पिंपरी – श्री संताजी महाराज जगनाडे मंदिर संस्थेचे व्यवस्थापक तथा येवला येथील मुळ रहिवासी चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांना तेली समाजाचे समाज भूषण तथा राज्य मंत्री जयदत्त क्षिरसागर यांचे हस्ते ‘समाज गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे , सचिव राजेश येवले यांचेसह समाजातील प्रतिष्ठित उपस्थित होते ,

संत जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.