–

भुसावळ : मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात शनिवारी, 13 रोजी दुपारी घडला.या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. भावेश अनिल भालेराव वय 25, भगवान साळवे नगर, फेकरी या तरुणाचा खून झाला असून . डोक्यावर व गळ्यावर वार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच दुपारी घटनास्थळी
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व कर्मचार्यांनी धाव घेतली. मृतदेह ट्रामा सेंटरला हलवण्यात आला.


