भुसावळ : भुसावळ शहरातील खडका रोडवरील हिरा हॉलजवळ शनिवार, रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या वादातून अंडापाव विक्रेता अजीम शेख (वय ३५) याच्यावर चाकू व लोखंडी रॉड मारून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजीम शेख हा तरुण अंडापाव विक्री करून उदरनिर्वाह करीत असतो . शुक्रवार, १२ रोजी त्याचा लहान भाऊ रईसोद्दीन शेख व मित्र शाहरूख खाटीक व आरोपीचा भाऊ यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाले होते व या वादाचा वचपा काढण्यासाठी खडका रोडवरील हिरा हॉलजवळ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अजीम शेख येताच त्रिघांनी त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॅाडचा उपयोग करीत अजीमला मारहाण करण्यात आली तसेच चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात अजीम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.




