भुसावळ – शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख ,जनप्रिय,शांत सयंमी अभ्यासू नेतुत्व माज़ी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नुकतीच भुसावळच्या शिलेदारांनी शिवसेनिकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातोश्री येथे जाऊन भेट घेतली . प्रसंगी शिवसैनिकांचे दैवत स्व बाळासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा करून आशिर्वाद घेतला . तर उद्धवसाहेब यांना श्री छत्रपति शिवाजी महाराजांची मुर्ती ट्रॉफ़ी , चाँदीची तलवार व शाल देवून सन्मान करण्यात आला. यावेळी भुसावळच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली .

. भेटी दरम्यान जळगाव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत ,रेलकामगार सेना विभाग प्रमुख ललील मुथा,शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, गवळी समाज जिल्हा अध्यक्ष व शिवसेने चे रहीम भाई गवळी ,शिवसेना उपशहर प्रमुख राकेश खरारे , कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा ) यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते


