ममता फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम : जेष्ठ नागरिकांना भेट वस्तू देवून घेतले आशिर्वाद :

भुसावळ – ममता फाउंडेशन तर्फे संस्था उद्घाटना निमित्त जेष्ठांचे आशिर्वाद घेऊन उपक्रम सुरू करण्यात आला सदैव समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या समाजसेविका सौ नूतनताई फालक, व उद्योजक हिरामण रघुनाथ फालक यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या ममता फाउंडेशनच्या माध्यमातून गुरुमाईच्या आशिर्वादानंतर जेष्ठ नागरिकांचे सुद्धा आशिर्वाद घ्यावे व मिळेल त्याला सहकार्य करावे या उदात्त भावनेने उपक्रम करण्याचे ठरविले या अनुषंगाने व संस्थेच्या Let the entire word be happy.या धोरणानुसार येथील ९२ वर्षीय बागुल आजी यांना सस्नेह भेट देवून ममतारुपी आशिर्वाद घेतले भेटवस्तू मध्ये ब्लॅंकेट , शाल, व चेअर यांचा समावेश आहे . यावेळी फाउंडेशनचे ,वैभव पाटील संस्थापक अध्यक्षा सौ नूतन फालक , उज्वला बागुल यांनी मनोगत व्यक्त केले तर हिरांमण फालक यानी आभार मानले . यावेळ गोटू यांचेसह अन्य सदस्य उपस्थित होते .